शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी

 


शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी


वाशीम : ( दि. 11 एप्रिल )
तालुक्यातील सुरकंडी येथील शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात  ( दि. 11 एप्रिल ) रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 
   वाचनालयात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेवून जयंती साजरी केली जात असते. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करत गर्दी न करता हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाचनालयाचे नियमित वाचक असलेले जनार्दन भोयर यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर , संदीप इरतकर, बबनराव धामणे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. यावेळी लॉक डाऊन च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.  फीजिकल डिस्टन्स ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला.