लॉक डाऊन च्या अंमलबजावणीसाठी ग्राम सुरक्षा दलाचा पुढाकार

 


लॉक डाऊन च्या अंमलबजावणीसाठी ग्राम सुरक्षा दलाचा पुढाकार


 


लॉक डाऊन च्या अंमलबजावणीसाठी ग्राम सुरक्षा दलाचा पुढाकार


वाशीम : (  दि. 11 एप्रिल )
   कोरोना आजाराला पायबंद घालण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन केल्या गेले आहे. या लॉक डाऊन ची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यातील सुरकंडी येथे ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले असून या दलाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. 
     तालुक्यातील सुरकंडी येथे दि. 10 एप्रिल रोजी प्रभारी पोलीस पाटील महादेव डुबे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम सुरक्षा दलाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील कायदा व सुव्यवस्थेबाबत लोकात जनजागृती करणे, लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश न देणे, गावात विनाकारण कुणालाही फिरू न देणे, कुणाच्या आरोग्याची समस्या उद्भवल्यास प्रशासनास कळविणे आदी कार्य हे ग्राम सुरक्षा दल पार पाडत आहे. दलाच्या सदस्यांनी गावातील बस स्टँड तसेच गावातील प्रमुख मार्गांवर खडा पहारा देणे सुरू केले आहे. यामाध्यमातून बाहेरून येणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांना परातविले जात आहे. तसेच गावातील लोकांनी घराबाहेर निघू नये, फिजीकल डिस्टन्स पाळावे, तोंडाला मास्क लावावा आदी कार्य हे दल पार पाडत आहे. या दलामध्ये गजानन बबनराव धामणे,  संदीप ज्ञानेश्वर इरतकर, आक्रम भूरान पप्पूवाले, गजानन रामचंद्र भोयर,  इमाम घासी दर्गीवाले, युसुब हसन बेनीवाले, उस्मान चंदू भवानीवाले, चंद्रकांत जयाजी चव्हाण, चंदू रहेमान बेनीवाले,  रहेमान इमाम बेनीवाले,  भिकासाहेब रन्नु  बेनीवाले, गजानन देवबा कालापाड,  पोलीस पाटिल महादेव मसाजी डुबे आदींचा समावेश आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.