शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
वाशीम : ( दि. 14 एप्रिल )
तालुक्यातील सुरकंडी येथील शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात दि. 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लॉक डाऊन संदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष तथा वाचनालयाचे संचालक गजानन भोयर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. दरवर्षी मोठ्या प्रमानात हा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन नियमांचे पालन करून फिजिकल डिस्टन्स ठेवून आणि मास्क लाऊनच अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप इरतकर यांची उपस्थिती होती. यावेळी जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर यांनी दहा वैचारिक ग्रंथ वाचनालयास भेट दिले.