सुरकंडी येथे ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी

सुरकंडी येथे ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी


सुरकंडी : ( दि. 28 मार्च 2020 )


वाशिम तालुक्यातील पंचाळा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुरकंडी सह पंचाळा , मोहगव्हाण, येथे ग्रामपंचायत च्या वतीने दि. 27 मार्च रोजी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.


संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणू ने कहर माजविला आहे. राज्यात सुद्धा दररोज कोरोना पीडितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अश्या प्रसंगी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायत स्तरावर जंतुनाशक वस्तूंचा वापर करून फवारणी केली जात आहे. शुक्रवारी ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच घराबाहेर न पडता ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. सरपंचा सौ. सुरेखा सतिश  डुबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.